पुणे

“महागडी वाहने मौज म्हणून वापरण्यासाठी चोरीचा मार्ग नडला, तब्बल १४ वाहने चोरणारा सराईत चोरटा हडपसर पोलिसांकडून शिताफीने गजाआड – दहा लाखाचा मुद्देमाल जप्त”

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मोलमजुरी करणाऱ्या युवकास वेगवेगळ्या दुचाकी वापरण्याच्या मोहात चोरीचा मार्ग निवडला अन सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला, पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे आढावा बैठकीत वाहनचोरी रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते. यावरून हडपसर पोलीसांनी मोठी कारवाई करत १४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले, १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपास पथक अधिकारी गुन्हेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, अनिरूध्द सोनवणे, भगवान हबर्ड, मनोज सुरवसे, अमोल दणके, असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, एक इसम संशयीत रित्या दुचाकी सह मिळून आला. या संशयित इसमाकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाण्यात घेवून येवून त्याचेकडे तपास केला असता आरोपी नामे परशुराम ऊर्फ परश्या शिवाजी मोरे वय २४ वर्ष रा. सध्या मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर जिल्हा पुणे मुळगाव :- मु.पो. कलहिप्परगा ता.अक्कलकोट, जिल्हा सोलापुर ज्याने पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापुर, कर्नाटक या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सोलापुर शहर / ग्रामीण येथे मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे परशुराम ऊर्फ परश्या शिवाजी मोरे वय २४ वर्ष रा. सध्या मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर जिल्हा पुणे मुळगाव : मु.पो. कलहिप्परगा ता. अक्कलकोट जिल्हा सोलापुर यास हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४७५/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून एकूण १४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण १४ गुन्हे उघडकीस झाले असून कि.रू. १०,००,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ३ होंडा युनिकॉन, २ अॅक्टीव्हा २ हिरोहोंडा पॅशन, २ होंडा शाईन, १ ज्युपीटर, १ हिरो स्प्लॅन्डर, १ बजाज प्लॅटीना, १ हिरो होंडा डिलक्स, १ बुलेट अशा १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे – हडपसर पो.स्टे ०७, भोसरी पो.स्टे ०२ आणि लोणीकंद, विश्रामबाग, बारामती, विजापुर पो.स्टे सोलापुर, इंडी, कर्नाटक याठिकाणी प्रत्येकी ०१ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी हा मोलमजुरीचे काम करतो. त्यास वेगवेगळ्या गाडयांची आवड असल्याने तो वाहने चोरून मुळगावी जात असे व परत पुण्यात येत असे. तसेच काही वेळेस बारामती, सोलापूर, विजापुर कर्नाटक या ठिकाणाहून येताना देखील दुचाकी गाड्या चोरून आणून त्याचा वापर करीत असे.

सदरची कामगिरी रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे, पोनि (गुन्हे) विश्वास डगळे साो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समिर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, सचिन रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
हडपसर परिसरात गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे मात्र पोलीस तपस पथकाने केलेल्या सततच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.