पुणे

डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सन्मानार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मैदानात..

आज डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना पुणे शहराचे वतीने डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

https://youtu.be/zDSbDKXCd4Ihttps://youtu.be/zDSbDKXCd4I

या प्रसंगी बोलतांना शिवसेना उपशहर प्रमुख (ठाकरे गट) डॅा.अमोल अशोक देवळेकर यांनी भूमिका मांडली की,”आजचा हा दिवस देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. परंतू आज भारताचा विचार केला असता तर जी मूल्य-विचार-संस्था रुजवल्या जोपासल्या त्या उभ्या राहण्यासाठी आयुष्यभर अविरतपणे संघर्ष केला ती मुल्ये-ती विचारसरणी आज धोक्यात आलेली दिसत आहे..

https://youtu.be/0VLcseKfP9Ihttps://youtu.be/0VLcseKfP9I

भारताच्या संविधानिक चौकट ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे परंतू आजचे राज्यकर्ते ही चौकटच उध्वस्त करायला निघाले आहेत..

संसदेचे सार्वभौमत्व आज धोक्यात आलेले आहे..न्यायव्यवस्थेवर  प्रश्नचिन्ह उभे रहात आहे..स्वायत्त तपासयंत्रणा या राजकिय स्वार्थापोटी दावणीला बांधल्या गेल्यात..

विकेंद्रित लोकशाही’ हे आपलं वैशिष्ट्य असताना त्याला मूठमाती देऊन केंद्रीय पद्धतीची हुकूमशाही किंवा अध्यक्षीय लोकशाहीकडे देशाची वाटचाल कधीच सुरू झाली आहे..

ज्या पद्धतीनं गेल्या आठ वर्षांत भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे ते बघता आगामी काळामध्ये ‘संविधान बचाव’साठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल..

https://youtu.be/vuDrFFPhdj8https://youtu.be/vuDrFFPhdj8

बाबासाहेबांच्या संघर्षाने आपल्याला बहाल केलेली लोकशाही मूल्ये धोक्यात आलेली असतांना त्यांची जयंती फक्त जल्लोषात साजरे करणे हे पुरेसे ठरणार नाही तर त्यांनी दिलेली मूल्ये,त्यांनी दिलेला विचार जोपासणे आणि त्यांनी दिलेली ‘संवैधानिक चौकट ‘ शाबुत राहील यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.”

या प्रसंगी कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी “मविआच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ आणि भारतीय लोकशाहीच्या बचावासाठी मविआ कटिबद्ध आहे आणि आम्ही सारे संघर्ष करत राहू” अशी शपथ घेतली..

https://youtu.be/8PgxtucbYbAhttps://youtu.be/8PgxtucbYbA

 

शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांमधे देशाला संविधान  तयार करून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना दिले. देशवासियांसाठी राष्ट्रीय एकता, अखंडता आणि वैयक्तिक प्रतिष्ठेवर आधारीत जीवनपद्धतीवर भारावून गेलेली भारतीय संस्कृती निर्माण केली. ती टिकवणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

या प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार रविंद्र धंगेकर, उपशहरप्रमुख डाॅ अमोल देवळेकर, प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, युवा सेना शहर अधिकारी सनी गवते, समन्वयक युवराज पारिख, विधानसभाप्रमुख विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, शहरसंघटीका पल्लवी जावळे, पद्मा सोरटे, करूणा घाडगे, अनुपमा मांगडे, अनिल दामजी,संतोष सोनवणे,रुपेश पवार,राहूल जेकटे, नंदू येवले, नितिन रावळेकर, अतुल गोंदकर, किसन लोखंडे, भगवान वायाळ, संदिप गायकवाड,शेखर जावळे, नागेश खडके, आकाश रेणूसे, निलेश राउत, बकुळ डाखवे, किरण जाधव, राहुल शेडगे, सूर्यकांत पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.