पुणे

ग्रामीण विकासासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासाची गरज :डॉ नरेंद्र जाधव

शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास या पुस्तकाचे प्रकाशन

भारतातील ग्रामीण विकासामध्ये युवकांचा मोठा सहभाग असून ग्रामीण विकासामध्ये युवकांनी योगदान द्यावे या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तयार केलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास या पुस्तकाचे प्रकाशन करताना अर्थतज्ञ व माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांनी वरील उद्गार काढले.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तयार केलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास या पुस्तकाचे प्रकाशन डॉ नरेंद्र जाधव यांच्या शुभहस्ते आणि शसंजय किर्लोस्कर, शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे, मा. राजेश पांडे, कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार, रा.से.यो संचालक डॉ सदानंद भोसले यांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ सविता कुलकर्णी, प्रा. नितीन लगड, डॉ अंजू मुंढे, डॉ वंदना सोनवले, डॉ जी.डी आवटे, प्रा गौरव शेलार उपस्थितीत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक करताना पुस्तकाविषयी माहिती सांगितली.

२००७ मध्ये मा डॉ नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये अधोरेखित करण्यात आला होता. या उपक्रमावर आधारित गेली सतरा वर्षे वेगवेगळ्या गावांमध्ये सर्वेक्षण करून पुस्तकांचे प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी हवेली पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले तसेच अशा प्रकारची कामे होणे गरजेचे असून यातून अनेक उद्देश साध्य होतात असे मत व्यक्त केले.

 

या पुस्तकामध्ये महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, पर्यावरण शास्त्र, पर्यटन, भूगोल, मानसशास्त्र, मराठी, वाणिज्य या विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मु. पो. केतकावळे ता. पुरंदर येथील विविध घटकांचे सर्वेक्षण करून त्याचे विश्लेषण करून अहवाल सदर पुस्तकात एकत्र केलेले आहेत. यामध्ये गावातील पाणी, प्राणी, वनस्पती, मृदा,शेती पध्दती, पर्यटन, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सविता कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रशांत मुळे यांनी केले.