पुणेहडपसर

छत्रपती शाहूमहाराज रयतेचे राजे होते. : प्राचार्य दत्तात्रय जाधव.

हडपसर,वार्ताहर. राजे अनेक होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आदर्श घेऊन रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे,रयतेच्या मनातील राजे खूप कमी होऊन गेले.आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करून शाहूमहाराज यांनी लोककल्याणकारी कारभार केला.

 

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते.छत्रपती शाहूमहाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा कला,क्रीडा,उद्योग,कृषी,कुस्ती,सहकार,शिक्षण अशा सर्व बाबतीत सर्वांगीण विकास केला. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ओमकार केकाण,सार्थक हांगे यांनी शाहूमहाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. रवींद्र भोसले यांनी शिक्षक मनोगतात शाहूमहाराज यांच्या समग्र जीवनाची माहिती सांगितली.व राजर्षी शाहूमहाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगितली.

 

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख संगिता रूपनवर व सविता पाषाणकर व सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका माधूरी राऊत यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.तर आभार रूपाली सोनावळे यांनी मानले.