पुणे

PUNE CRIME : मंत्री मार्केट येथे चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुद्देमालासह आवळल्या मुसक्या – हडपसर पोलीसांच्या धडाकेबाज कारवाईचे होतेय कौतुक – हडपसरचा थरारक प्रसंग सिसिटीव्ही मध्ये कैद”

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )

:-वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या हडपसर टीमची धडाकेबाज कामगिरी

:-पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून एका  चोरट्यास घेतले ताब्यात

:-1 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

मंत्री मार्केट येथील दुकानाचे शटर उचकटून चोरी करून पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न हडपसर पोलीसांनी हाणून पाडला. हडपसर पोलीसांच्या रात्री गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी सर्तकता दाखवित धाडसी कामगिरी केल्यामुळे मुद्देमालासह एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री गस्तीवर असलेले हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी रशिद शेख व लखन दांडगे हे हडपसर वेश व मंत्री मार्केट या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मेन मुमेंट कलेक्शन, अविष्कार बिल्डींग, मंत्री मार्केट या ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानाचे जवळ जाताच दुकानात चोरी करून दुचाकीवर मुद्देमाल घेवून पसार होताना तिन चोरटे दिसले. यावेळी पोलीस कर्मचारी रशिद शेख व लखन दांडगे यांनी लागलीच पाठलाग करत नालबंद मस्जिद शेजारी त्यांना गाडी आडवी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांकडून पोलीसांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला. या थरारक घटनेत चोरट्यांनी पोलीसांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीसांच्या धाडसी कामगिरीमुळे एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले तर दोन चोरटे मुद्देमाल व दुचाकी घटनास्थळावर सोडून पसार झाले.

हडपसर पोलीसांचे कौतुक

नुकतीच दहशत करणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळून मोक्का कारवाई केलीअन हडपसर मधील कोयता गँगचा निपटारा झाला, त्यानंतर चोरी करताच काही क्षणात चोराला पकडले त्यामुळे हडपसर व मंत्री मार्केट परिसरातील व्यावसायिकांनी पोलीसांनी दाखविलेल्या सर्तकतेचे कौतुक केले. हडपसर पोलीसांच्या दक्षपणामुळे परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid034U2mRvVy6ZQzgZNQJVwhYhiFyPMNWha1wRwD2ttQZrq7dgNqmLJh9j3QJZN7vTb5l&id=100025368982505&mibextid=Nif5oz