पुणेमहाराष्ट्र

ज्ञान प्रबोधिनी विज्ञान गटाच्या वतीने विज्ञान चित्रपट महोत्सवाचे दि.1 व 2 *रोजी आयोजन

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान गटाच्या वतीने दि.१,२ जुलै रोजी पुण्यात विज्ञान चित्रपट महोत्सवाचे(सायन्स फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले आहे.स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल, येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत दोन्ही दिवशी हा महोत्सव होईल. विज्ञानात रुची निर्माण करणारे लघुपट(Short Films), माहितीपट(Documentaries) आणि चित्रपट(Movies) या महोत्सवामध्ये दाखविण्यात येणार आहेत. त्याच सोबत विषयानुरूप तज्ज्ञांची व्याख्याने, प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तरे व चर्चा, विविध कृती अशी सत्रे होणार आहेत. विज्ञानात व चित्रपटांमध्ये रस असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्ती हे या महोत्सवात सहभागी होऊ शकतात.

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत १ जुलै रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारच्या सत्रात प्लांट इंटेलिजन्स संशोधक डॉ. आदित्य पोंक्षे यांच्याशी व शेवटच्या सत्रात चित्रपट अभ्यासक, लेखक आणि पटकथाकार गणेश मतकरी यांच्याशी चर्चा आयोजित करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी, म्हणजेच २ जुलै रोजी पहिल्या सत्रात संशोधक जी. व्ही. पवन कुमार संवाद साधणार आहेत, दुपारी जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कथेचे अभिवाचन करण्यात येणार आहे, व संशोधक डॉ.मिलिंद वाटवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल.

नाव नोंदणीसाठी tinyurl.com/scifilmfest2023 हा गुगल फॉर्म भरावा किंवा ८३९०७७०२५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.