महाराष्ट्र

आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

आमदार विकास निधीतून होणार कामे

सिरोंचा:तालुक्यातील अंकीसा येथे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अंकीसा येथे स्थानिकांच्या मागणीनुसार समक्का सारक्का मंदिर बांधकामासाठी आमदार विकास निधीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आली.तसेच याठिकाणी सिमेंट रस्त्याचेही बांधकाम होणार असून त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मौजा राघवरावनगर येथे जिल्हा परिषद शाळेची नवीन वर्गखोली बांधकाम करण्यात येणार आहे.या सर्व कामांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.आमदार धर्मराव बाबा आत्राम स्वतः गेल्या तीन दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात मुक्कामाणे असून विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा धडाकाच सुरू केला आहे.

अंकीसा येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी येथील सरपंच सरिता सुदर्शन पेद्दी,उपसरपंच सतीश चिप्पा,प्रभाकर शानगोंडा,महेश कंती, मोहन मेचीनेनी,प्रवीण आकुला,सतीश आकुला,बापू रालाबंडी,समय्या पांडवला आदी मान्यवर उपस्थित होते.