पुणे

दोन जिल्ह्यात दरोडे,जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक, १८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

गेल्या काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण भागात व अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भागात व दुर्गम असणाऱ्या वाड्या वस्त्यांवर दरोड्यांचे व जबरी चोरीचे प्रमाण वाढले आहे.तसेच घरफोड्याही मोठ्या प्रमाण वाढल्या होत्या. या गोष्टींना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी ६ ते ७ जणांच्या टीम तयार करून वेगवेगळया ठिकाणी रवाना केल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेने तयार केलेल्या पथकामार्फतीने समांतर तपास करीत असताना सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने यापूर्वी अजय उल्हास्था काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले ते त्याचेकडे केले तपासातून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरून आरोपी नामे गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा. ता. आष्टी पारनेर, जि. बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात चोरीस गेले मालापैकी काही ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक बदाम, चोरलेली यूनिकॉर्न गाडी, घडयाळ, ब्रेसलेट असा मिळून आला.

तसेच त्याचेकडे केले तपासात त्याने वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरी करून चोरलेले सोन्याचे दागिने हे किरण भाऊसाहेब बेद्रे या सराफास विक्री केल्याची माहीती सांगितलेली असून त्यावरून किरण भाऊसाहेब बेद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेले मालापैकी २९४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण रू. १७,६४,०००/- किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान १) अजय उल्हास्या रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर, २) गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ३) पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे, ४) तुषार ऊर्फ विशाल कैलास काळे, ५) शरद कैलास काळे, अ.नं. ३ ते ५ रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

 

सदर गुन्हयातील आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक १५/०७/२०२३ पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे.