पुणे

चिकन शॉपचा नवा ट्रेंडी लूक ! अमीर चिकन – चिकन व्यवसायास ब्रँड मिळवून देणारी मोठी चेन

पुणे (विशेष प्रतिनिधी)
अमीर चिकन ब्रॅंड : पुणे शहर नव्हे तर भारतातील सर्वात मोठी चेन म्हणून ज्या उद्योगसमूहाचा उल्लेख केला जातो ते अमीर चिकन…अत्याधुनिक संकल्पनेतील ब्रँडेड चिकन स्टोअर.
कोरोना, बर्ड फ्लू संसर्गानंतर नव्या पद्धतीच्या आधुनिक अमीरच्या चिकन शॉप्सकडे ग्राहकांची गर्दी वाढतेय.
पश्चिम महाराष्ट्रातील रिटेल चिकन विक्री उद्योगातील अग्रगण्य अमीर चिकन समूहाने ब्रॅंडद्वारे प्रक्रिया व थेट विक्री क्षेत्रात 25 वर्षांपासून यशस्वी वाटचाल केली आहे, समूहाचे चेअरमन विजय मोरे, त्यांची पत्नी व अमीर – चिकनची भागीदार नलिनी मोरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या चर्चेचा सारांश. 
अमीर चिकनचा व्यावसायिक विस्तार
अमीर चिकन समूहाने २५ वर्षापूर्वी रिटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले. छोट्या टपरीतुन सुरवात केलेल्या या व्यवसायाचा विस्तार डेली 70 हजार किलो विक्री पर्यंत झाला आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यासह सातारा, मुंबई, या भागात रिटेल मध्ये कोंबड्याचा पुरवठा केला जातो.

“एक दिवसाची पिल्ले साधारण ४० व्या दिवशी २१०० ग्रॅम वजनाची होतात, त्यावेळी त्या पक्ष्यांची आम्ही विक्री करतो. यात शेडची मालकी ही शेतकऱ्याकडे तर पक्ष्याची मालकी ही कंपनीकडे असते. याला ब्रॉयलर कॉन्ट्रक्ट फार्मिग किंवा करारपद्धतीचे कुक्कुटपालन असे म्हणतात.
‘अमीर-चिकन’ची संकल्पना काय?
विजय मोरे यांनी अतिशय खडतर परिस्थिती मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी अमीर-चिकन हे अन्य चिकनपेक्षा कसे वेगळे आहे, हे सांगितले. ते म्हणतात लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता वाढत आहे. म्हणून, अमीर चिकन समूहाने सर्वसोयींनी युक्त ब्रॅंडद्वारे थेट विक्रीत २५वर्षांपूर्वी केलेले पदार्पण आता एक मोठ्या समूहाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आम्ही प्रक्रियायुक्त चिकन उत्पादनासाठी एक सुरक्षित आणि अद्ययावत यंत्रणा उभी केलीय. सूसज्ज शीतसाखळीद्वारे चिकन सेंटर्सवर माल पाठवला जातो. या प्रक्रियेत स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्यविषयक सर्व काळजी घेतली जाते. कमी वजनाचे, लहान पक्षी इथे प्रोसेस्ड केले जातात. प्रत्येक पक्षी १.६ ते १.७ किलो वजनाचा असतो. त्यामुळे चवीला छान लागतो. पक्ष्याच्या कटिंननंतर तो साधारण एक किलोपर्यंत येतो. दोन लेग, तर चार विंग पिसेस असे त्याचे स्वरुप असते. ही प्रक्रिया रिगर मॉर्टिस (Rigor mortis) या शास्त्रीय संकल्पनेवर आधारित आहे. त्यामध्ये कोंबडीचा मृत्यू झाल्यानंतर आधी ती कडक होते व नंतर ती मऊ होते. या प्रक्रियेदरम्यान जिवाणू वाढतात. हे टाळण्यासाठी कापल्यानंतर कोंबडी बर्फांच्या थरामध्ये टाकली जाते. अन्य चिकत विक्रेते हे प्रामुख्याने मोठे पक्षी वापरतात. कारण त्यामध्ये टाकाऊ भाग अत्यंत कमी येतात. आमची ब्रॉयलर चिकन, बोनलेस चिकन, गावरान अंडी आणि मॅरिनेटेड उत्पादन ही मुख्य उत्पादने आहेत. यासोबत अन्य कंपन्यांची फ्रोजन उत्पादनेही आहेत.
विजय मोरे म्हणाले की, जेवढी लहान कोंबडी असेल, तितकी ती टेंडर असते. कोंबडी मोठी होताना त्यामध्ये फायबरचे प्रमाण वाढत जाते. अमीर-चिकन मध्ये आम्ही मुद्दाम लहान व कमी वजनाच्या कोंबड्या कापण्यासाठी वापरतो. कोंबडीच्या शरीराचे वजन ३७ अंश सेल्सिअस असते, ती कापल्यानंतर एक ते दोन तासामध्ये जिवाणूंच्या वाढीला सुरुवात होते. आमच्या चिकनमध्ये कापल्यानंतर त्वरीत ० ते ४ अंश सेल्सिअस तापमानामध्ये थंड करतो. त्यामुळे अगदी तीन ते चार तासापर्यंत किंवा घरी जाईपर्यंत जिवाणूंची वाढ होत नाही. तसेच घरी गेल्यानंतर आपल्या फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवल्यास तीन दिवसापर्यंत ठेवता येते. हा अन्य चिकन आणि अमीर चिकनमधील महत्त्वाचा फरक आहे.
भविष्यातील योजना
नलिनी मोरे म्हणाल्या, की प्रत्येक विक्री केंद्रावरील स्वच्छतेमुळे ग्राहकांचा विशेषतः मुले, मुली आणि बायका यांचा ओढा असतो. पुण्यामध्ये आमची साडेतीनशे हुन अधिक स्टोअर आहेत, पुण्यात प्रत्येक किलोमीटरवर अमीर चे स्टोअर उपलब्ध असून ग्राहकांना ताजे, स्वच्छ चिकन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
भविष्याविषयी आम्ही मॅरीनेटेट पॅकेज्ड उत्पादनामध्ये उतरत आहोत. रेडी टू इट आणि रेडी टू कुक अशी उत्पादने आणतानाच पुण्यासह अन्य शहरांमध्ये आऊटलेटची संख्या वाढवण्याचा विचार आहे. आपण ब्रॅण्डेड कपडे, शूज वापरतो. मग आपण उघड्यावरचे चिकन का खातो? हा विचार केला पाहिजे. उघड्यावर कापलेल्या व स्रोत माहित नसलेल्या चिकनपेक्षा पारदर्शक, स्वच्छता पाळलेल्या चिकनला प्राधान्य द्यायला हवे.
आरोग्यासाठी चिकनचे महत्त्व
विजय मोरे म्हणाले, की चिकन हे स्वस्त व सहज उपलब्ध असा प्रथिनांचा स्रोत आहे. आपल्याला प्रति किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिनांची म्हणजेच ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीला ७० ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. हाडे आणि स्नायूंना ताकद देण्याबरोबरच बी१, बी६ आणि बी १२ या जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. ( पोल्ट्री अवेअरनेस वेबसाईटद्वारे प्रसारित.) डॉक्टर रुग्णांना चिकन, अंडी खाण्याचा सल्ला देतात जे पचायला सोपे असते व प्रोटिन्स वाढतात.
महाराष्ट्रात चिकन 80 अंश सेल्सियस मध्ये शिजविले जाते इतर देशांप्रमाणे आपल्याकडे भारतात प्रामुख्याने कच्चे मांस खाल्ले जात नाही त्यामुळे जिवाणूंचा धोका अजिबात नाही, बर्ड फ्लू किंवा कोरोना या चिकनमुळे होतात या भंपक कल्पना आहेत यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

My coderr iss ttrying tto perdsuade me tto
move too .net froom PHP. I hae alwways djsliked thhe idea because of thee expenses.
Butt he’s trhiong nne tthe less. I’ve een using WordPresss on various websitess for about a year and aam worried about switching too another platform.
I hazve hearrd good thinvs abbout blogengine.net. Is thre a
wway I can import alll myy wordpress posfs into it?

Anny kindd off help would be greatly appreciated!

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x