पुणे

डॉ.दादा गुजर हॉस्पिटल व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबीर

डॉ.दादा गुजर हॉस्पिटल, हडपसर पुणे व रोटरी क्लब ऑफ पुणे vibrant  ईस्ट तर्फे दि. ३० जुलै रोजी शांती रेसिडेन्सी को ऑप हाउसिंग सोसायटी हडपसर येथे आरोग्य शिबिरात स्तनाचा कर्करोग, रक्तदाब व मधुमेह यांची मोफत तपासणी करण्यात आली.

 

५१  सभासदांनी त्यात सहभाग घेऊन आपला प्रतिसाद नोंदविला . सोसायटी चे अध्यक्ष सचिन सोनार, सचिव दादासाहेब लोणकर यांनी व रोटरी क्लब चे संभाजी झेंडे तसेच राजेश बरभाई यांनी आयोजन केले. तसेच सोसायटी चे संचालक मंडळाच्या राजश्री दळवी, अनिल गायकवाड, चंद्रकांत पोटे, संकेत तीवरेकर, राजेंद्र खजेपवार, चिदानंद कांबळे, आनंद लंबाते, ऋषिकेश कुंजीर, त्रिसदस्यीय कमिटी विजय भामरे, सतीश देसाई व निलेश नीचल यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले.