पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या देशातील पहिल्या छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची भेट, कलाकार संजय श्रीधर यांचे शिंदे-फडणवीसांनी केले कौतुक!

पुणे:-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ए आय तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या भारतातील पहिल्या छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन संजय श्रीधर कांबळे यांचा मुक्तकंठाने गौरव केला .
येथील सारसबागे समोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात जवळ संजय कांबळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन सुरू आहे .या प्रदर्शनामध्ये AI या नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाने विकसित झालेली ही चित्रे निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी संजय कांबळे यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार व त्यातून निर्माण केल्या चित्राबद्दल ची माहिती विस्तृतपणे दिली.
या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेली चित्रे उत्तम असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
याप्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे ,पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, नगरसेवक अविनाश बागवे, महोत्सव समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आढागळे ,सचिव दयानंद आढागळे माजी नगरसेवक रवी पाटोळे ,मातंग समाजाचे नेते अनिल हातागळे, एडवोकेट महेश सकट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनासाठी अण्णाभाऊंच्या जीवनातील बालपणापासून ते रशियाचा प्रवास इथपर्यंत चित्रे तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आलेली आहेत. ही चित्रे पाहण्यासाठी पुणेकर आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.
मूळ बार्शीकर असलेल्या संजय कांबळे यांच्या या नव्या कला प्रकाराबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हे प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी श्रीधर कांबळे, पवन कांबळे तेजस कांबळे, सुजल आढागळे, अक्षय पंढरकर अनेक मंडळींनी परिश्रम घेतले.