पुणे

“हडपसर भाजीपाला सोसायटीच्या व्यापारी संकुलाचे मंगळवारी भूमिपूजन शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती” “अमृत स्मृती गौरव अंकाचे प्रकाशनही होणार; सोसायटीचे चेअरमन प्रविण तुपे यांनी दिली माहिती”

हडपसर (सतीश भिसे )
हवेली तालुक्यातील अग्रगण्य संस्था असलेल्या हडपसर भाजीपाला सोसायटी व्यापारी संकुलाच्या निर्मितीचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते मंगळवारी (दि.१) रोजी दुपारी दिड वाजता वाजता नेताजी सुभाष मंगल कार्यालय शेजारी संपन्न होत आहे.अशी माहिती हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रवीण तुपे यांनी दिली आहे.

हडपसर भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्था यावर्षी अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने सामाजसेवक डॉ. बाबा आढाव, उद्योजक सतीश मगर व प्राचार्य शं. मा. डिंगणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे संस्थेचेही प्रविण तुपे यांनी सांगितले.संस्थेने सहकाराबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही वेळोवेळी योगदान दिले आहे. अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेच्या व्यापारी संकुलाची भूमिपूजन, गौरव अंकाचे प्रकाशन व पुरस्कार सोहळा होणार आहे. डॉ. बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी स्वर्गीय रामभाऊ तुपे समाजसेवा पुरस्कार, मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांना उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब मगर उद्यमशीलता पुरस्कार तर निवृत्त प्राचार्य शं. मा. डिंगणे यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शैक्षणिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रविण तुपे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष साहेबराव काळे व कार्यकारी संचालक जयप्रकाश जाधव उपस्थित होते.

७५ वर्ष अखंड कार्यरत सोसायटी … 
हडपसर भाजीपाला सोसायटीचा हवेली तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून आजही नावलौकिक असून, संस्था ७५ वर्षे अखंड कार्यरत आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते, उद्योजक,व्यावसायिक तयार झाले आहेत .हडपसर मधील संस्थांची मातृसंस्था म्हणून हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीची ओळख निर्माण झाली आहे .सुभाष सामुदायिक संस्था, रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल ,साधना सहकारी बँक ,महाराष्ट्र आरोग्य मंडळ ,जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी ,साने गुरुजी रुग्णालय ,साने गुरुजी शिक्षण संस्थांना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करीत आहे. खडतर प्रवासामध्ये संस्थेने मोठा पल्ला गाठला आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या हस्त सोसायटीच्या व्यापारी संकुलनाचे भूमिपूजन होत आहे हीच बाब हडपसरसाठी भूषणावह
आहे.
प्रविण सादबा तुपे
चेअरमन- हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटी