पुणे

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प उरुळीकांचन बीट लोणीकाळभोर 1 अंतर्गत पठारेवस्ती येथे 76 वा 15ऑगस्ट “स्वातंत्र्य दिन” मोठ्या उत्साहात साजरा…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : लोणीकाळभोर : देशभरात आज 76 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली “मेरी मिट्टी मेरा देश”हे अभियान राबविण्यात आले असून आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम मार्च 2022 पासून सुरु आहे.

 

या कार्यक्रमाचा समारोप 30 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे समारोपीय कार्यक्रमामधील उपक्रमाअंतर्गत दि. 9 ऑगस्ट 2023 ते 20 ऑगस्ट 2023 कालावधीत मेरी मिट्टी मेरा देश तसेच मिट्टी को नमन विरोंको वंदन अभियान राबविण्यात येत आहे. तसेच घरोघरी तिरंगा हे अभियानही राबविण्यात येत आहे. तसेच मा. विकास खरगे, प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यालयावर दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 सूर्यास्तानंतर ध्वज फडकवणे व सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली घेणे हे शासकीय निमशासकीय कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी व प्राथमिक आरोग्यकेंद्र, पशुवैध्यकीय दवाखान्यात, सर्व शाळा अशा ठिकाणी बंधनकारक राहतील. असे विविध प्रकारचे कार्यक्रम 15 ऑगस्ट च्या निमित्ताने संपूर्ण देशात राबविण्यात येत आहेत.

आज कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथील पठारे वस्ती, लोणी स्टेशन, समता नगर, आणि घोरपडे वस्ती या चार अंगणवाड्यांचा झेंडावंदनचा कार्यक्रम एकाच वेळी ग्रामपंचायत सदस्या सुनंदाताई काळभोर यांच्या हस्ते सकाळी 8:30 वा.करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपाली काळभोर, रमेश निकाळजे – मराठी पत्रकार परिषद हवेली ता. अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते -सतीश काळभोर, अभिजित बडदे -तंटामुक्ती अध्यक्ष, पर्यवेक्षिका नायर मॅडम, रवींद्र कदम,विजय सकट, विजय थोरात, विजय बोडके,गौरव काळभोर, नागसेन ओव्हळ, रणजित निकाळजे,ज्ञानेश्वर नामगुडे सेविका – पल्लवी निकाळजे, चंद्रकला काळभोर, कविता कांबळे, अश्विनी फलटणकर मदतनीस- रेहाना शेख, ललिता थोरात स्वाती नाचन, प्रमिला मोरे, इत्यादी मान्यवर तसेच बालक व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यावेळी ग्रामपंचायत कडून अंगणवाडीच्या सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले. त्यानंतर सेविका पल्लवी निकाळजे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.