पुणे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लोणी काळभोर येथील स्मिता नॉर्टन यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर,- राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील स्मिता नॉर्टन यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट् प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी स्मिता नॉर्टन यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी असताना स्मिता नॉर्टन यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नॉर्टन यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

 

पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणार
याबाबत नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्षा स्मिता नॉर्टन म्हणाल्या की, “राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी काम करणार आहे. तसेच राज्यात पक्ष बळकटीसाठी, मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.