पुणे

मुलीने ”बॅड” टच”‘ला विरोध केल्यामुळे बापाने मुलीच्या गालावर गरम इस्त्रीचा दिला चटका ; नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.”सक्खा बाप पक्का वैरी” झाल्यामुळे पुन्हा एकदा मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कात्रज मध्ये स्वतःच्या 15 वर्षीय मुलीसोबत तिच्याच वडिलांनी बॅड टचचा प्रयत्न केला. परंतु मुलीने तीव्र विरोध केल्यामुळे बापाने रागाच्या भरात तिच्या गालाला गरम इस्त्रीचा चटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कात्रज येथील 15 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून परिसरातील मुली आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोलिसांनी 43 वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही शाळेत जाते. दरम्यान, शाळेत जाण्यासाठी ती कपड्यांना इस्त्री करत होती. यावेळी तिचे वडिल पाठिमागून आले व तिला बॅड टच करण्यास सुरूवात केली.परंतु तिने विरोध केला व जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करुन तिच्या बॅगेमधील पुस्तके फाडून टाकली. त्यानंतर तिला पुन्हा बॅड टच करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने बापाला ढकलून दिले. व बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिला पकडून तिच्या गालावर गरम इस्त्रीचा चटका दिला आणि मारहाण केली तसेच कोणाला सांगितले तर तुला जीवे मारिन अशी धमकी दिली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक थले करत आहेत.