पुणे

लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट उधळला, वाचला एकाचा जिव

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -लोणी काळभोर परिसरात काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक दत्तात्रय रामपुरे यास रेकॉर्डवरील आरोपी अक्षय कांबळे याने जबर मारहाण केली होती. अरोपी अभिषेक हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन वरील तडीपार इसम प्रणव शिरसाट याच्या टोळीचा सदस्य असल्याने त्यांची पुन्हा मोठी भांडणे होऊन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्या बाबतची गोपनिय माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सदरच्या गुन्हेगारांवर पाळत ठेवण्या बाबतच्या सूचना व आदेश त्यांनी तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे व तपास पथकाला दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडुन मिळालेल्या आदेशाप्रमाणे तपास पथकातील अंमलदार हे तडीपार इसम प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचे इतर सदस्यांचे पाळतीवर होते. त्यातच तपास पथकातील अंमलदार पोशि वीर व कुदळे यांना काल दि. ३०/०६/ २०२३ रोजी सायं. ६:३० वा. चे सुमारास माहिती मिळाली की, प्रणव शिरसाट टोळीचा प्रमुख सध्या तडीपार असलेला प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचा तडीपार सदस्य अभिजीत आहेरकर पिस्टल व कोयत्या सारखी घातक हत्यार जवळ बाळगुन कोणतातरी गुन्हा करण्याचे उद्देशाने कदमवाकवस्ती परिसरात आले आहेत. त्यांनी सदरची बातमी मिळताच तपास पथक प्रभारी पो.उपनिरी अमित गोरे यांना सांगीतली त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांना कळवून त्यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे सोबतचे पोलीस स्टाफसह कारवाई करणे करीता रवाना झाले. पोलीस स्टाफ कदमवाक वस्ती, पालखी स्थळ येथे गेलोअसता. तेथे पालखी स्थळा च्या मैदानाच्या कडेला पालखी विसावा शेडच्या जवळ टोळी प्रमुख प्रणव शिरसाट व अभिजीत आहेरकर हे मोटारसायकलवर थांबलेले पोलीस स्टाफला दिसले. पोलीस स्टाफला पाहुन ते दोघे तेथुन पळुन जात असताना पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेऊन त्यांचेकडुन एक गावठी पिस्टल व लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तसेच तपास पथक प्रभारी पोउपनिरी गोरे यांनी तडीपार आरोपी १) प्रणव भारत शिरसाठ,( वय २२ वर्षे, रा. आंग्रे वस्ती, लोणी स्टेशन, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) २)अभिजीत अभिमन्यु आहेरकर, (वय २२ वर्षे कन्या शाळेजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे )तपास केला तेव्हा प्रणव शिरसाट याने अभिजीत आहेरकर, अभिषेक रामपुर व त्याचे इतर टोळी सदस्यांचे साथीने अक्षय कांबळे याचा खुन करण्याचा कट रचला असल्याची माहिती मिळुन आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक दत्तात्रय रामपुरे, (वय २१ वर्षे, धंदा शिक्षण, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे )अभिषेक रामपुरे यालाही ताबडतोब अटक करण्यात आली असून त्यांचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतुस तीन लोखंडी कोयते असा एकूण १०,८००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपिंना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली असून पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, पोउनिरी अमित गोरे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णीक पोलीस सहआयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो. हडपसर विभाग, श्री दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा ३८७१ सातपुते, पोहवा / ४३२ गायकवाड, पो. हवा २४३४ बोरावके, पो. हवा सायकर पोना / ७३३५ नागलोत, पो. ना. ७६९५ जाधव, पोशि पवार, पोशि कुदळे, पोशि/ १२००५ शिरगीरे, पो.शि. ३२९ विर, मपोशि फणसे, सर्व नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, यांच्या पथकाने केली आहे.