पुणे

Breking news : MIM’च्या शहराध्यक्ष रुहीनाज शेख यांनी मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड च्या सभेत केले धडाकेबाज भाषण…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पिंपरी चिंचवड येथे झालेल्या मराठा आरक्षण मोर्चात MIM पक्षाच्या शहर अध्यक्ष यांनी मराठा मोर्चाला पाठिंबा देत धडाकेबाज भाषण करून सर्वांची मने जिंकली. काल शनिवार दि. 9 रोजी आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि, जालना) येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये उस्फूर्त बंद पाळण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी झालेल्या निषेध सभेत ‘एमआयएम’च्या (MIM) महिला शहराध्यक्षा रुहीनाज शेख यांचे भाषण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तसेच त्यांच्या हुषारीमुळे आणि चाणक्षपणामुळे या सभेला व बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्नही त्यांच्यामुळे फसला. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या यामध्ये MIM सहभागी होती.

त्यामुळे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते निघालेल्या निषेध मोर्चात व नंतर पिंपरी चौकात झालेल्या निषेध सभेत सहभागी झाले होते. त्यात त्यांच्या कट्टर शिवभक्त तरुण महिला शहराध्यक्षा रुहीनाज यांनी भगवा फेटा बांधलेला असल्याने त्या व्यासपीठावर उठून दिसत होत्या. सभेपूर्वी आंतरवालीतील लाठीमाराचा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यात रुहीनाज सामील झाल्या होत्या. नंतर पिंपरी चौकात झालेल्या निषेध सभेत, तर त्यांनी भाषणच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपली भावना समजावी म्हणून हिंदीतूनही त्या बोलल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘तुमंच आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देऊनच रुहीनाज यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. त्यावर तिथे उपस्थितांतील काही जणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. रुहीनाज यांच्याकडून अल्ला हो अकबरसारखी घोषणा होईल, असे जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांच्या वाटत होते. या घोषणांमुळे व्यासपीठावर काही वेळ शांतता पसरली होती. पण, हीना यांनी आपल्या हुशारीने आणि प्रसंगावधानता दाखवित जय शिवराय असे एकदा नाही, तर दोनदा उत्तर दिले.

तसेच घोषणा देणारे हे आपलेच बांधव असल्याचे सांगत त्यांनी त्यांची बोलतीच बंद केली. दरम्यान, आपला डाव फसल्याचे लक्षात येताच जय श्रीरामच्या घोषणा देणारे शांत झाले. मोदीसाहेबांपर्यंत माझा आवाज पोचला पाहिजे, असे सांगत रुहीनाज यांनी मराठीनंतर हिंदीत भाषण केले. तुम्ही कितीही हिंदू विरुद्ध मुस्लिम यांना लढवायचा प्रयत्न करा,या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी कितीही बंदे इथे पाठवा, पण आम्ही लढणार नाही. कारण आम्हाला माहित आहे हे तुम्ही जाणूनबुजून करत आहात ते. आम्ही मराठी आरक्षणावरच ठाम राहणार आहोत असेही त्यांनी ठणकावून सांगताच निषेध सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. “मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत त्यांनी मराठी बांधवांसोबत राहणार असे सांगितले. आंतरवालीत आमरण उपोषणाला बसलेल्या लढवैय्या मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर पाठिंबाही दिला. जय जिजाऊ, जय शिवराय असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

निषेध सभेनंतर पत्रकारांनी रुहीनाज यांच्याशी संपर्क साधून विचारले असता की जय श्रीरामच्या घोषणा देणारे हे भिडेगुरुजींचे कार्यकर्ते होते, असे त्यांनी सांगितले. जय श्रीरामच्या घोषणेवर अल्ला हो अकबरसारखी घोषणा वा उलट उत्तर माझ्याकडून घेऊन त्यांचा सभेला व बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न होता. त्याचमुळे मी जय शिवराय अशा उलट घोषणा देऊन तो हाणून पाडला, असेही त्या म्हणाल्या. अशी सभा उधळण्याची षडयंत्र जाणूनबुजून करण्यात येतात परंतु आपल्या ते लक्षात आले पाहिजे आणि त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. जर आपण भावनेच्या आहारी जाऊन वेगळेच काही वक्तव्य केले तर त्यांचा उद्देश साध्य होतो पण मी काल त्यांना चोख उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली.