पुणे

“श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांच्या भव्य प्रतिमेची प्रतिमेची होणार स्थापना – प्रमोद नाना भानगिरे, धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा…

श्रीराम चौकात लवकरच प्रभू श्रीरामांची प्रतिमेची स्थापना होणार असून प्रभाग २६ मधील हिंदू बांधवांचे स्वप्न साकार होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांनी दहीहंडी उत्सवात बोलताना केले.
नाना भानगिरे यांनी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने श्रीराम चौकात आयोजित केलेला धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात हजारो गोपाळभक्तांच्या उपस्थितीत यंदा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे, रमेशबापू कोंडे पाटील,पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, मनपा उपायुक्त प्रसाद काटकर, ढाकणे साहेब, बाळासाहेबतात्या भानगिरे, शरद मोहोळ, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, विजयाताई वाडकर, योगेश ससाणे, उपशहरप्रमुख संतोष रजपूत, विकी माने, काका पवार, योगेश जोशी, विभागप्रमुख अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, संतोष जाधव, विश्वास पोळ, अमर घुले, विकास भुजबळ, कपिल काळे, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, सागरराजे भोसले, राजुशेठ ढेबे, नाना भिसे, रवींद्र भानगिरे, माउली भानगिरे, संतोष भानगिरे, गणेश बोराटे, बबन आंधळे, ज्योस्ना सातव, सारिका पवार, अयोध्या आंधळे, विकास शेवाळे, गोरख पांचाळ आणि प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबईहुन आलेल्या क्रेझी ईगल गोविंदा पथकाने धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी फोडण्याचा यावेळी मान पटकावला.