पुणेमहाराष्ट्र

दोघांचेही लग्न जमवून ठेवले ; त्यामुळे लग्नाअगोदर शारीरिक संबंध ठेऊन लग्नास नकार…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीबरोबर आरोपीचे घरच्यांच्या संमतीने लग्न जमल्यानंतर घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. आणि त्यानंतर मात्र, लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परस्पर संमतीने लग्न जमल्यानंतर फोनवर सतत बोलणे सुरु झाले एक दिवस बोलता बोलता घरी कोणीच नसल्याचे आरोपी मुलाला समजले याच गोष्टीचा फायदा घेऊन मुलीच्या घरी जाऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. आणि थोड्याच दिवसांनी लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर २८ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन राजेंद्र तळवार (रा. आशा एम्पायर, गोकुळ कॉलनी, दिघी) याच्यावर कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 मे 2023 पासून घडत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा विवाह आरोपीबरोबर ठरविण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यात फोनवर बोलणे होत असे. 3 मे रोजी आरोपी सचिन तिच्याशी फोनवर बोलून घरी कोण आहे का असे विचारले. तिने घरी कोणी नसल्याचे सांगितले. तेव्हा तो तिच्या घरी आला. त्याने तिच्याशी लगट करून आता आपले लग्न ठरले आहेचं, असे म्हणून तिची इच्छा नसतानाही तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.

परंतु त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याबाबत विचारणा केल्यावर आरोपीने अगोदर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पण मुलीने लग्नास फ़ोर्स केल्यामुळे आरोपीने तिला हाताने मारहाण केली. आणि मला तुझ्याशी लग्न करायचे नाही असे सांगितले त्यानंतर तरुणीने मुंढवा पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास मुंढवा पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहेत.