पुणेमहाराष्ट्र

पुण्यातील कसबा पेठेत 100 वर्ष जुन्या लाकडी वाड्याला आग; सुदैवाने जीवितहानी नाही…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : कसबा पेठेतील 100 वर्ष जुन्या लाकडी वाड्याला पहाटे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. वाडा बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

प्रथम महाजनवाड्याला लागली होती आग. मिळालेल्या माहितीनुसार, कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे वाडा आहे. मोटे वाड्यापासून काही अंतरावर महाजन वाडा आहे. महाजन वाडा लाकडी आहे. पहाटे महाजन वाड्याला आग लागली. वाड्यात त्यावेळी 14 जण होते. तसेच 9 भरलेले गॅस सिलेंडर पण होते. परंतु आग पसरण्याच्या आधीच लोकांनी भरलेले सिलेंडर बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागताच स्थानिकांनी लागलीच त्याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला दिली. दरम्यान, वाडा लाकडी असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली तोपर्यंत कसबा पेठ अग्निशमन दलाच्या जवान येथे दाखल झाले. तोपर्यंत आग भडकली गेली होती. शेजारी बरेच लाकडी वाडे असल्याने गोंधळ उडाला.तसेच लोकांच्यात भीती पसरली होती. त्यामुळे शेजारीच लाकडी वाड्यात राहत असलेल्या लोकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता.

परंतु, जवानांनी तातडीने पाण्याचा मोठा मारा करून काही वेळातच लागलेली आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी ही कामगिरी केली. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून मोठी दुर्घटना टाळळी त्यामुळे सर्व जवानांचे स्थानिकांकडून मोठे कौतुक होत आहे. आग आटोक्यात येताच स्थानिकांनी सुटकेचा निःस्वाश घेतला.