पुणेमहाराष्ट्र

कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा राज्य सरकारचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात लाक्षणिक उपोषण

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. जी काही सरकारी भरती होत आहे त्यातही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत.परीक्षा फी च्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरत आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी आणि शिक्षणाचे खाजगीकरण,स्पर्धा परीक्षा,नोकर भरती,पेपर फुटी, कंत्राटीकरण याविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या लाक्षणिक उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, विद्यार्थी अभ्यासिका समिती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या कष्टकरी युवक संघटनेने ही सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.

या आंदोलनास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिलाअध्यक्ष मृणालिनी वाणी,युवती अध्यक्ष सुषमा सातपुते,गणेश नलावडे, अजिंक्य पालकर,दीपक कामठे शिल्पा भोसले, बाळासाहेब अटल, रोशन निखाते,प्रमोद पाटील,रितेश रामराव, बाली काळे, नंदिनी पानेकर, राजश्री पाटिल, अनीता पवार व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.