पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राजकारणात मतभेद असले तरी कधीच मदभेद नसतात. महाराष्ट्रातील सर्किय महिला लोकप्रतिनिधींनी कधीच महिला राजकारणाचे लॉबिंग केले नाही, असा सूर रविवारी परिसंवादामध्ये उमटला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे महिला दिनानिमित्त आयोजित परिसंवादात शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलम गोर्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. पत्रकार नेहा सराफ यांनी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय आवटे, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते आदी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हयातील लोणी येथील व्यक्ती विकास केंद्र इंडिया बँगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर या केंद्राच्या नगर प्रचारक श्रीमती सुनिता तांबे व दै. जनप्रवासच्या व्यवस्थापिका सौ. सुरेखा खानोरे यांना रणरागिणी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रतिभा नारी संस्था, लिज्जत पापड यांना रणरागिणी सामाजिक संस्था पुरस्कार देण्यात आला.
सुजाता खानोरे यांना रणरागिणी संपादक पुरस्कार विशेष सन्मान करण्यात आला. पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे महिलांचे नुकसान झाले, असे म्हटले जात असले तरी माझ्यामते पुरुषांचेच जास्त नुकसान झाले आहे, असे मत व्यक्त करताना संजय आवटे म्हणाले, पुरुष म्हणजे कणखरच असे मानले जात असल्याने वेदना होतात, तेव्हा अश्रु ढाळून मन मोकळे करण्याची मोकळीक त्यांना नाही. भावनांना वाट करु न देता मनामध्ये साचत ठेवण्याच्या भूमिका पुरुषांना वठवावी लागते. त्यामुळे पुरुषसत्ताक संस्कृतीनेही पुरुषांचेच अधिक नुकसान केले आहे. चुल आणि मुल यातून बाहेर पडून महिलांनी स्वत:ला सिद्ध केले असले तरी अजूनही ग्रामीण भागात अंधश्रध्देच्या आहारी जाणार्या महिलाच आहेत. शिक्षणाची कास धरलेल्या महिलांना अंधश्रध्देला बळी पडू नये, असे राज्य संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती तांबे यांचे आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री.श्री रवी शंकर, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पा, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, मा. आ. अण्णासाहेब म्हस्के, साध्वी प्रिती सुधाजी गुरुकुलचे संस्थापक इंद्रभान डांंगे, युवक नेते डॉ. सुजय विखे, डॉ. राजेंद्र पिपाडा, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष ममता पिपाडा, खा. सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. बाळासाहेब थोरात, आ. वैभवराव पिचड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, निलेश वाकचौरे यासंह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
