पुणेमहाराष्ट्र

लाचखोर पोलिसांकडून मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ; अपघातात वडील गमावलेल्याकडून PSI ने घेतली 20 हजार लाच…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार लाचखोर पोलिसांकडून झाला आहे असे बोलले जात आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात ACB कडून एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडून कारवाई केल्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरीत चिंचवड येथे 18 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात दोन ट्रॅप करून तीन लाचखोरांना पुणे एसीबीने दणका दिला होता. त्यात पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सांगवी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार (जमादार) सुनील शहाजी जाधव (वय 49) याला पिंपळे सौदागर पोलिस चौकीतच 25 हजाराची लाच एका महिलेकडून घेताना पकडले होते. तसेच आज पुणे ग्रामीणला सेम तसाच प्रकार घडला आहे.

भिगवण पोलिस पोलीस स्टेशन मधील PSI प्रवीण सुग्रीव लोकरे (वय 53) याला मधुकर विठ्ठल कोरडे (वय 35) या वकिलामार्फत वीस हजार रुपयांची लाच घेताना पोलिस स्टेशनसमोरच या दोघांना पकडण्यात आले. संतापजनक बाब म्हणजे अपघातात वडील गमावलेल्या 41 वर्षीय तक्रारदाराला त्यांच्या वडिलांना धडक देणाऱ्या वाहनाच्या विम्याची आणि गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी PSI लोकरेने ही लाच घेतली.

हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार झाला. प्रथम त्याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. नंतर वीस हजारावर तडजोड केली. ती त्याने आज पोलिस ठाण्यासमोरच कोरडेमार्फत घेतली. त्यामुळे या दोघांनाही एसीबीने (ACB) ताब्यात घेतले. एसीबीचे पीआय वीरनाथ माने व नवनाथ वाळके, जाधव माने या पथकाने ही कारवाई केली. अशा लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस खात्याला व खाक्या वर्दीला काळिमा फासण्याचे काम बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.