पुणेमहाराष्ट्र

चर्मकार ऐक्य परिषद(रजि) महाराष्ट्र राज्य बैठकी मध्ये कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सूर्यकांत गवळी यांची निवड…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे – रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 4 ठिकाण – संत रविदास मंदिर,तिसरे धाम कात्रज,पुणे येथे चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक ज्येष्ठ समाजसेवक  गोंविदराव खटावकर(सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर उहापोह करुन मार्ग काढण्यासाठी योग्य नियोजन केले.भविष्यातील चर्मकार समाजाची अखंडता,अस्तित्व आणि अस्मिता कायम राहिल यासाठी *प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही निवडक पदाधिकारी यांना जबाबदार्या देण्यात आल्या.

त्या पुढिल प्रमाणे…
● मा.सुर्यकांत आप्पा गवळी – प्रदेशाध्यक्ष
● मा.मीराताई शिंदे – महिला प्रदेशाध्यक्षा
● मा.विजय घासे – संपर्क प्रमुख
● मा.संजू बनसोड – गटई कामगार,प्रदेशाध्यक्ष
● मा.गजानन लिंभोरे – युवक प्रदेशाध्यक्ष
● मा.विठ्ठल धस – प्रदेश कार्याध्यक्ष
● मा.दिनेश जाधव – प्रदेश उपाध्यक्ष
● मा.सचिन यादव – प्रदेश महासचिव
● मा.लहु बावीस्कर – प्रदेश प्रवक्तै
● सौ.सुरेखाताई दिघे – महिला प्रदेश कार्याध्यक्षा
● सौ.सुरेखाताई सुर्वे – महिला प्रदेश उपाध्यक्षा
● मा.सुनिताताई कसबे – महिला प्रदेश प्रवकत्या
● मा.अनिकेत भोसले – प्रदेश युवक कार्याध्यक्ष
● मा.तुळशीराम वाघमारे – प्रदेश सोशलमिडीया प्रमुख
● मा.जालिंदर सोनवणे – कला व सांस्कृतिक समिती प्रमुख

अशा नियुकत्या करण्यात आल्या. या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हातुन 140-150 पदाधिकारी/40-45 संस्थापक असे एकुण 200-250 चर्मकार समाज बांधव उपस्थितीत होते. यावेळी सर्वांच्या एकमताने अखिल भारतीय रविदासिया धर्म, भारत, गुरु रविदास विश्व महापीठ, भारत, व राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा ,भारत .या तीन देश पातळीवरती व जागतिक स्तरावर ती काम करणाऱ्या चर्मकारांच्या संघटनेला चर्मकार परिषदेचे” दीपस्तंभ” ठेवावेत व त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य घेत राहावे व त्यांना आपण महाराष्ट्रातून चर्मकार समाजाची ताकद देण्याचे ठरले.

 

लवकरचं आणखी कार्यकारिणी विस्तार करुन पदग्रहण सोहळा आयोजित केला जाईल,असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी यांनी केले.