पुणेमहाराष्ट्र

पुण्यात दारूच्या नशेत इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मित्राची हत्या…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यात चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिऊन गच्चीवर बसलेल्या मित्राला किरकोळ कारणावरून गच्चीवरून खाली ढकलून देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून मित्राने दारुच्या नशेत मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन मित्र दारून पिण्यासाठी गच्चीवर बसले असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला त्यामुळे एका मित्राने दुसऱ्या मित्राला गच्चीवरून ढकलून देऊन त्याची हत्या केली आहे. या घटनेची तक्रार चंदननगर पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे.तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी मित्राला बेड्या घातल्या आहे. सदरील घटना ही पुण्यातील नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बैजू मंडल आणि शंभु राम हे दोघेही मित्र होते. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात येऊन भाड्याच्या खोलीत राहत होते.

बैजू रोज किराणा दुकानातून उधारीवर सामान घेऊन येत असे ही बाब शंभुला कळताच त्याने दुकानदाराला बैजूला सामान देऊ नको असे सांगितले. याचा राग बैजूच्या मनात होता. त्यामुळे त्याने शंभुला रात्री घरी बोलावले. दोघे रात्री गच्चीवर दारू पिण्यास बसले. थोड्याच वेळानं किराणा मालाच्या उधारीच्या विषयावरून किरकोळ वाद झाला. नंतर हा वाद इतक्या टोकाला गेला की शंभूने रागाच्या भरात त्यांच्यात झटापट झाली आणि त्यातच शंभूणे बैजूला गच्चीवरून खाली ढकलून दिले. या तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यात नेले.

परंतु त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी संतोष कोंडिबा गिनलवाड याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंभूवर गुन्हा दाखल केला. शंभू दपी राम याला पोलिसांनी घरातून अटक केले.सदरील घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.