पुणेहडपसर

कार घासल्याच्या कारणावरून खून्याला ठोकल्या बेड्या हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः सहा-सातजणांवर गुन्हा दाखल

हडपसर ः चंदवाडी (ता. हवेली) येथे कार घासल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून धारदार शस्त्र व दगडाने खून करणाऱ्या एकाला अटक केली असून, सहा-सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित संजय भोसले (वय 30, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. सचिन सकट (रा. चंदवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अथर्व दादासाहेब साबळे (वय 18, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, ता. हवेली) आणि अनोळखी 7-8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि. 12 डिसेंबर, 2023) रात्री दहाच्या सुमारास चंदवाडी रस्त्यावर कार घासल्याच्या कारणारून फिर्यादीचे मामा अभिषेक भोसले (वय 30, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली) यांच्याबरोबर किरकोळ वाद झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळी येऊन शिवीगाळ करीत धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून खून केला. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही दगड व लाथाबुक्क्याने मारहाण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.