पुणेहडपसर

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयामध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उदघाटन सोहळा संपन्न

हडपसर, पुणे – विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उदघाटन सोहळा संपन्न झाला. ॲड. चेतन प्रभाकर शेवाळे( प्रसिद्ध कायदेतज्ञ व माजी उपाध्यक्ष -पुणे बार असोसिएशन पुणे), गंगाराम चौधरी (ज्येष्ठ फुटबॉलपटू व प्रशिक्षक पुणे ),माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर (अध्यक्ष- विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान,पुणे ), चंद्रकांत ससाणे सर (सचिव -विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), दत्तोबा जांभुळकर (सरपंच -वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, पुणे )व विवेक काठमोरे( वार्ताहार – दैनिक प्रभात) यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे व क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. चेतन शेवाळे यांनी विद्यार्थांनी शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा आहे, खेळामुळेच अभ्यासात व खेळात एकाग्रता वाढते, असे सांगितले. त्यासाठी कठीण परिश्रम करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. खेळामुळे आपण सकारात्मक होऊन जीवनातील विविध अडचणींना सामोरे जाऊ शकतो व आपले जीवन सुकर व समृद्ध होऊ शकते, असेही सांगितले.

 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेनिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाची प्रेरणा मिळावी म्हणून विविध गुणसंपन्न प्रमुख पाहुणे कार्यक्रमासाठी बोलाविल्याचे सांगितले.खेळामुळेच स्पर्धा जिंकण्याची वृत्ती, नेतृत्व गुण, जिंकण्याची प्रेरणा, जिद्द अशा गुणांचा विकास होतो.व खेळाडूंमध्ये खेळभावनेने हार -जीत स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होत असते, असेही सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ फुटबॉलपटू व प्रशिक्षक गंगाराम चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शुभेच्छा देऊन किशोरवयापासूनच खेळाचा सराव,मेहनत करून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरून खेळणाऱ्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरून खेळण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याचा शारीरिक मानसिक विकास साधण्यासाठी खेळाला महत्व देऊन पाल्याच्या खेळास पाठिंबा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करावा,असे सांगितले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटाचा खाऊ वाटप करण्यात आला.

याप्रसंगी सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनील गायकवाड, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, तसेच मायाताई ससाणे, सोनाली परदेशी,डॉ. गौरी धाडीवाल,चंद्रकांत तोंडारे, स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर कांबळे, सन्मित्र बँकेचे संचालक गणेश फुलारे, ॲड मछिंद्र वाडकर, नितीन आरु, बाळासाहेब हिंगणे, सूर्यकांत देडगे, शब्बीर शेख, नवाब शेख , ॲड. अक्षय कुंजीर,सतीश शेठ गवळी,कुंडलिक गवळी, किशोर शिंदे, सोपानराव शिवरकर,अशोक शिवरकर,सुरेश शिवरकर,रमेश काकडे, जयराम जांभुळकर,संतोष सुपेकर, रहेमान शेख,मुकुंद कुदळे,सिद्धार्थ परदेशी,अनंतराव शिवरकर, दीपक शिंदे, रेवा अहिर, वानवडी ग्रामस्थ,पालक,सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन शिक्षिका दीपा व्यवहारे यांनी केले.व आभार प्रदर्शन माजी नगरसेविका कविताताई शिवरकर यांनी केले.