पुणे

कदम-वाकवस्ती पालखीस्थळ प्रवेशद्वार किंवा सभागृह याला स्व. राकेश आनंदराव काळभोर यांचे नाव देण्यात यावे – महिला बाल विकास समिती सदस्य कविता दत्तात्रेय अंबुरे

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

कदम-वाकवस्ती पालखीस्थळ प्रवेशद्वार किंवा सभागृह याला स्व. राकेश आनंदराव काळभोर यांचे नाव देण्यात यावे असे निवेदन शिवसेनेच्या महिला बाल विकास समिती सदस्य कविता दत्तात्रेय अंबुरे यांनी दिले
कदम-वाकवस्ती येथिल पालखीस्थळ पुर्वी काही लोकांनी त्या ठिकाणी खाजगी संस्था उभारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्थानिक नागरीक आणि स्व. राकेश आनंदराव काळभोर यांनी मिळून त्या ठिकाणी पालखीस्थळ होण्यासाठी खुप मोठे प्रयत्न केले व तेथे मुलांकरीता खेळण्यासाठी मैदान, नागरीकांसाठी वॉकिंग ट्रॅक व इतर सुविधा होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचे फलस्वरूप आज स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणावर या मैदानाचा व सभागृहाचा लाभ घेताना दिसत आहेत. पालखी स्थळाचे अध्यक्ष मोरे साहेब, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, कै. राकेश आनंदराव काळभोर व इतर मान्यवरांच्या अथक प्रयत्नातुन पालखी स्थळाचा कायापालट झाला आहे. व त्याचा फायदा नवयुवक व स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

पालखी स्थळावरील सभागृहात गोरगरीबांची लग्ने समाजिक कार्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. व कै. राकेश आनंदराव काळभोर यांचे खुप मोठे योगदान असुन त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पालखी प्रवेशद्वारास किंवा सभागृहाला कै. राकेश आनंदराव काळभोर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे दत्तात्रेय माणिक अंबुरे व स्थानिक नागरिकांनी केली.

असे निवेदन कदम-वाकवस्ती चे सरपंच गौरी(ताई)गायकवाड , ग्रामसेवक अमोल घोळवे व सामाजिक कार्यकर्ते चित्तरंजन गायकवाड यांना दिले.