पुणे

शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली आणि मुस्लिम दफनभूमी चा प्रस्ताव झाला रद्द , क्रिडांगणाच्या जागेत मुस्लिम दफनभूमीचा होता प्रस्ताव

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
कोंढव्यात क्रिडांगणाच्या जागेत मुस्लिम दफनभूमी करण्याचा डाव एका माजी नगरसेवकाने घातला शिवसेना शहरप्रमुखांनी तातडीने आयुक्तांची भेट घेतली अन मुख्यमंत्र्यांच्या मदतीने हा प्रस्ताव रद्द केला, नाना भानगिरे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोंढवा खुर्द सर्वे क्रमांक 44 येथे क्रीडांगणाच्या जागी मुस्लिम दफनभूमी मंजूर करण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक व स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मात्र आर्थिक बाबींसाठी तडजोड करणाऱ्या काही तथाकथित पदाधिकाऱ्यांनी केला होता ही बाब स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या लक्षात आणून देत तेथील मुस्लिम दफनभूमी प्रस्ताव रद्द करण्याबाबत विनंती केली होती, त्यावर प्रमोद नाना भानगिरे यांनी महानगरपालिका आयुक्तांना वस्तुस्थिती विशद करून तात्काळ दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत चर्चा केली, तातडीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेवून या प्रस्तावाबाबत पुणे महानगरपालिकेला निर्देश देण्याबाबत विनंती करताच दफनभूमीचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला, शिवसेना सदैव येथील स्थानिक नागरिकांच्या पाठीशी असून मनमानी खपवून घेणार नाही असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.

तत्परतेने मुस्लिम दफनभूमीचा निर्णय रद्द केल्याने स्थानिक जितो सोसायटी,रविराज कॉलरडो,कुमार पृथ्वी,ईशा पर्ल सोसायटी,वर्धमान सोसायटी
काकडे वस्ती, ज्ञानेश्वर नगर व समस्त कोंढवा वासीय नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, मिलिंदभाऊ एकबोटे यांचे आभार मानले आहे.