पुणेमहाराष्ट्रहडपसर

लोखंडी हत्यार फिरवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः

पुणे, दि. २ ः फुड स्टॉलचे नुकसान करीत लोखंडी हत्यार फिरवून केस केली, तर जीवंत सोडणार अशी धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ओंकार केदारी (रा. केशवनगर, मुंढवा, ता. हवेली) याला घेतले असून, फरार आरोपींचा तपास सुरू आहे. याप्रकरणी सायली अतिश भुजबळ (वय २८, रा. ग्रीन वूड सोसायटी, झेड कॉर्नर, मांजरी बु।।) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, फुलेनगर मांजरी बुद्रुक येथील फूड स्टॉल बंद असताना उसने पैसे दिले नाहीत म्हणून आरोपी ओंकार केदारी आणि त्याच्या तीन साथीदारांनी स्टॉलच्या साहित्याचे नुकसान केले. सीसीटीव्ही फुटेज पाहून फिर्यादी यांनी गुन्हा गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन येथे यापूर्वी २०२१मध्ये गुन्हा दाखल आहे. फरार आरोपींच्या तपासासाठी शोध पथक रवाना करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.