अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाबुरावजी घोलप साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी कै. बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, कृष्णकांत कोबल, डॉ. अमित देवकुळे उपस्थित होते.
शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप यांनी पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहचवली. त्यांनी स्वतः गावोगावी बैलगाडीने, सायकलवरून आणि प्रसंगी पायी प्रवास करून तळागाळातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षण प्रसाराचे काम केले. असे प्रतिपादन पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी केले.
बाबुरावजी घोलप यांनी बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ७ सप्टेंबर, १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे श्री शिवाजी विद्यालय ही पहिली शाळा सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या या संस्थेचा आज मोठा विस्तार झाला आहे. असे मत प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. नाना झगडे, डॉ.राजेश रसाळ, डॉ. अशोक ससाणे, डॉ. शुभांगी शिंदे, प्रा. नितीन लगड, पवन कर्डक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.