पुणे

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार एकाच वेळी अर्ज भरणार, १८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे पुण्यात शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रियाताई सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे श्री रवींद्र धंगेकर हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सौ. सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, श्री. रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.