पुणे

“शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल – सांगता सभेत अमोल कोल्हेंच अजित पवारांना थेट आव्हान

नारायणगाव : शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, या शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान दिलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज नारायणगावात पार पडली. भर पावसात या सभेला नारायणगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते.

 

या सांगता सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधत हल्ला चढवला. डॉ. कोल्हे
म्हणाले की, जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होत.

दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं हा आमचा बाणा आहे. ज्या भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात. असे म्हणत डॉ. कोल्हे म्हणाले की,राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझं काम बोलत, म्हणून इथं अडकून पडावं लागलं. म्हणून आदरणीय दादांना विनम्रतेने सांगतो, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला तर प्रतिहल्ला करत.

मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तर त्याची तयारी ठेवा, असं थेट सुनावलं.

 

कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यस्त आहेत. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या नाही. बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न आहे, अस म्हणत बिबट्याच्या प्रश्नाकडे राज्यसरकार कडून होत असलेल्या दुर्लक्षावरुनही डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं.

“कितीही नोटीसा पाठवल्या तरी प्रश्न विचारत राहणार…

शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारत होते, हे डॉ. कोल्हे यांनी पुराव्यासह दाखवल. त्यानंतर त्यांच्याकडून डॉ. कोल्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस जाहीर सभेत दाखवत, डॉ. कोल्हे म्हणाले की, प्रश्न विचारले तेव्हा रामलिंग महाराजांची शपथ घेतली, आणि सांगितल माझा काही संबंध नाही.मराठी माणूस उद्योगपती असल्याचा अभिमान आहे. पण महाराष्ट्रात भूमिहीन शेतमजूर जो भारतात असोत त्याचा अमेरिकेत बंगला असतो याच गौडबंगाल कळलं नाही. कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही, कारण प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. जनहिताचे, लोकशाहीचे प्रश्न विचारत राहणार.