पुणेमहाराष्ट्र

पुणे शहर गुणवंत कामगार स्नेहमेळावा संपन्न…

—-गुणवंत कामगार कल्याण मंडळ पुणे शहर यांचा रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी उद्यान प्रसाद कार्यालय येथे गुणवंत कामगार कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न झाला.
— या कार्यक्रमात नवीन गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेल्या सदाशिव एकसंबे, परेश पारेख व प्रकाश कवडे, आदर्श व्यवस्थापन म्हणून इंटरव्हाॅल पूनावाला लिमिटेड मांजरी, आदर्श कामगार संघटना म्हणून झामील स्टील एम्प्लॉईज युनियन रांजणगाव, आदर्श महिला म्हणून सौ महानंदा वाले, आदर्श सामाजिक संस्था म्हणून ज्ञानदीप फाउंडेशन धायरी व दीपाऊ फाउंडेशन शिवणे, विशेष सामाजिक कार्य म्हणून शिवाजीराव बुचडे, रवींद्र चव्हाण, मारुती किंडरे, मारुती सातव, विलास कथुरे यांचा प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर दत्ता कोहिनकर, डायरेक्टर प्राॅडक्शन इंटरव्हाॅल पूनावाला मा. सुरेश वाघमोडे, सहाय्यक कामगार आयुक्त मा. मनोज पाटील, गुणवंत कामगार कल्याण मंडळ अध्यक्षा मा. डॉ. भारतीताई चव्हाण यांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 

—या कार्यक्रमात तानाजी पाटील व मुकेश ढगे यांनी स्वागत गीत सादर केले. महाराष्ट्र भूषण कामगार कवी राजेंद्र वाघ व रेणुका हजारे यांनी कविता सादर केली, कुमार आहेर यांनी महात्मा फुले यांचे जीवनावर एकपात्री कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात नेचर डिलाईट फाउंडेशनच्या महिलांनी मंगळागौर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
— कार्यक्रमाचे आयोजन राज्य कोअर कमिटी सहसचिव संजय गोळे, पुणे शहर अध्यक्ष महादेव धर्मे, सुरेश निकम, भगवान चव्हाण, प्रमोद बनसोडे, रवींद्र चव्हाण, राकेश सावंत, नामदेव भुरूक, किशोर शिंदे अस्फिया सय्यद, गोविंद जाधव यांनी केले सूत्रसंचालन पुणे शहर सचिव संपत खैरे तर आभार प्रदर्शन भाई ताम्हाणे यांनी केले.