पुणेमहाराष्ट्र

“हडपसरकरांना लवकरच मिळणार मेट्रो – योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हडपसरकरांना दिलेला शब्द पाळला……

पुणे (प्रतिनिधी )
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना 2018 रोजी PMRDA च्या माध्यमातून शिवाजीनगर- पूलगेट मार्गे हडपसर अशी मेट्रो मंजूर केली होतो, या मेट्रोच्या बाबत सर्व परवानग्या DPR हा मार्च 2019 रोजी मान्य झाला होता. परन्तु दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने या मेट्रो मार्गीचे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला व हडपसरच्या मेट्रोच्या मार्ग मोकळा झाला, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केलेला पाठपुराव्याला यश आले आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिनांक 9/11/2022 रोजी प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे या कामास गती मिळावी अशी मागणी केली होती, फडणवीस यांनी यासंदर्भात आयुक्तांना योग्य त्या सूचना दिल्या, 27/2/2023 च्या PUMTA च्या अहवालानुसार शिवाजीनगर-पूलगेट-हडपसर-लोणी काळभोर ही मेट्रो PP मॉडेलवर करणे शक्य असल्याचे सादरीकरण करण्यात आले, लवकरच याची बैठक आयोजित करून राज्यशासन या मेट्रो मार्गास मान्यता देवून कामास गती मिळेल त्यामुळे हडपसर मार्गांवर मेट्रो मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल माजी आमदार योगेश टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.