पुणेमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती संभाजी ब्रिगेडकडून साजरी..

संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला पाहिजे. एवढं त्यांचं कार्य महान आहे.तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.तो पाठ्यपुस्तकात शिकवला पाहिजे.अहिल्यादेवींचे कार्य हे जनतेला समजले पाहिजे.अहिल्यादेवी होळकर या लढवय्या तसेच राजनीतिकार होत्या.एक स्त्री सुद्धा मोठ्या शिताफीने राज्यकारभार हाकू शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अनेक अनिष्ट चाली रूढी परंपरा त्यांनी आपल्या राज्यात बंद केल्या. सती प्रथेला सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी कडाडून विरोध केला. स्त्री ही चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित राहू नये. म्हणून अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन सैन्यांमध्ये महत्त्वाचे स्थान दिले.लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट” असे म्हटले आहे. थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने असे म्हटले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिले जाईल.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना राज्यातील प्रजेची कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.

 

अशा महान लढवय्या राणीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते कार्याध्यक्ष अविनाश घोडके.विभागीय अध्यक्ष वेंकट मानपिडी. मल्लेश मानपिडी आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.