पुणे

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर सरचिटणीसपदी राहुल नामदेव होले…

पुणे (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर सरचिटणीस पदी सातववाडी-हडपसर येथील राहुल नामदेव होले यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
राहुल होले यांच्या नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
पक्षाच्या स्थापनेपासुन राहुल होले हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते असुन आजपर्यंत पक्ष संघटना वाढीबरोबरच विविध शैक्षणिक,आरोग्य, सांस्कृतिक आदी उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षाने त्यांची पुणे शहर सरचिटणिस म्हणुन नियुक्ती केली आहे.

 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संसदरत्न खासदार सुप्रिय सुळे, डॅा.अमोल कोल्हे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षावाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे होले यांनी सांगितले. पक्षात दिलेल्या संधीचा लाभ जाणसामान्यांना व्हावा यासाठी कार्यरत राहणार.
राहुल होले
सरचिटणीस – पुणे शहर