रायगड

८४ मोसे खोऱ्याची कुलदैवत शिवकालीन श्री शिरकाई देवी यात्रा मोठ्या उत्सहात संपन्न

राजगड तालुक्यातील शिरकोली गावातील ८४ मोसे खोऱ्याची कुलदैवत शिवकालीन श्री शिरकाई देवी ची यात्रा उत्सहात संपन्न झाली दिनांक 12 एप्रिल 13 एप्रिल असे दोन दिवस यात्रा असते शनिवारी सकाळी महाभिषेक झाल्या नंतर देवी ला ग्रामस्थ च्या वतीने नविन शालू आणि हिरे व रत्नजडीत अशे दागिने चढावले जातात सायंकाळी आरती नंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा वर आधारित व्याख्यान आणि भजनाचा कार्यक्रम झाला रविवारी पहाटे देवीचे गुरव सखाराम घनवट आणि मानकरी दत्तात्रय पडवळ गुरुजी यांचे हस्ते अभिषेक झाला पहाटे पासून भाविकांनी दर्शन रांग लावली होती रविवाची सुट्टी असल्या मुळे देशभरातून लाखोंचा वर भाविकांनी उपस्थिती लावली.

पारंपरिक वाद्याच्या गजरात देवींची पालखी निघाली पालखी मंदिरात आल्या नंतर ऐतिहासिक बगाड चा कार्यक्रम झाला नंतर ढोलताशा स्पर्धा आणि शेवटी ऐतिहासिक छबीना चा कार्यक्रम झाला ग्रामस्थ आणि देवस्थान यांच्या वतीने आलेल्या भाविकांनी साठी महाप्रसाद चे आयोजन केले होते यात्रे साठी एस टी महामंडळ च्या वतीने आमंदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या विनंती वरून भाविकांची गैर सोय होऊ नये म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होता दर्शन रांगेत भाविकांनसाठी गैर सोय होऊ नये म्हनुन राजगड तालुका भाजपा उपाध्यक्ष सुनील बोरगे,अशोक मरगळे ,मारुती पेडेकर संदीप मरगळे ,तानाजी पडवळ, सुरेश पेडेकर ,बिपीन पासलकर ,यांनी अधिक लक्ष दिले स्वागत कक्षात शिवशाही संघटना राजगड तालुकाध्यक्ष संतोष सांळेकर ,शिरकोली गावचे मा.उपसरपंच मारुती मरगळे विश्वस्त सुनील शेठ पासलकर धनंजय मरगळे ,शिवाजी मरगळे ,अक्षय पासलकर,सुधाकर पासलकर, ओंकार पासलकर ,भीमराव पासलकर यांनी जबादारी पार पाडली.

यात्रेसाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष किरण राऊत ,निर्मलाताई जागडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवारांनी उपस्थिती लावलेली पाहावंयास मिळाली यांचा सन्मान देवस्थान चे अध्यक्ष पंढरीनाथ पासलकर खजिनदार माऊली माने विश्वस्त वसंत अण्णा पासलकर दत्ता नाना साळेकर ,विलास साळेकर ,उत्तम मरगळे यांनी स्वागत केले वरून राजाने बगाड च्या वेळी हजेरी लावून सुद्धा भाविकांनी खूप गर्दी केली…..
आमदार मांडेकरांची उपस्थिती ठरली चर्चा चा विषय. …आज पर्येंत देवीच्या यात्रे साठी ग्रामीण भाग असल्या मुळे कधी ही कोणत्या ही विद्यमान स्थानिक आमदारांनी उपस्थिती लावली नव्हती मांडेकर यांनी राहून यात्रेत पालखी व ऐतिहासिक बगाड साठी उपस्थिती लावली त्यांना उत्तम मरगळे यांनि गावा व यात्रेतील परंपरा बदल माहिती देऊन चर्चा केली तसेच त्यांचा जवळ भाविकांनि व ग्रामस्थ नि फोटो साठी गर्दी केलेली दिसली.