रायगड

राजकीय पाठबळामुळे अवैध रित्या पोल्ट्री व्यवसाय, नागरिकांच्या आरोग्याला धोका, प्रशासनाचा कानाडोळा – अलिबाग मधील शिरवली येथील प्रकार

अलिबाग (साईनाथ म्हात्रे/ हर्षल पाटील यांसकडून)
अलिबाग तालुक्यातील शिरवली हे खेडे गाव या गावात ग्रामस्थ मंडळ शिरवली द्वारे ग्रामस्थांना गावाच्या डोंगर उताराचा भाग आहे अशा ठिकाणी प्लॉट वाटप करण्यात आले आहेत याच परिसरात सतीश मोरेश्वर पाटील यांची पोल्ट्री फार्म आहे, ज्यावेळी प्लॉटची वाटणी केली नव्हती तेव्हापासून ते तो व्यवसाय करत आहेत परंतु प्लॉट वाटप केल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे आपली घरे बांधली आणि आजमितीस तेथे मोठी वसाहत निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी पोल्ट्री फार्म दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
अनेकवेळा ग्रामस्थांनी तहसील कार्यालय ते ग्रामपंचायत कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन त्यांना भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते त्याची पूर्ण कल्पना अनेकवेळा दिली तरी काही कार्यवाही झाली नाही, शहानिशा केली असता असेही निदर्शनास आले सतीश पाटील यांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर बाबीचा आदर घेतला नाही, ग्रामपंचायत किवा प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे यांनीही त्यांस ना हरकत दाखला दिला नाही कारण जेथे पोल्ट्री फार्म आहे तेथील बाजूच्या घरातील लोकांनी दुर्गंधीमुळे पलायन केले आहे तसेच शेजारचे वातावरण इतके दूषित झाले आहे की शेजारील घरात त्या दुर्गंधीमुळे किडे सापडत आहेत, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व प्रकारची दखल कोणाकडूनही घेतली जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे सतीश पाटील यांच्या पत्नी स्वतः नारंगी गावाच्या सरपंच पदी विराजमान आहेत. त्यामुळे राजकीय दबाव तंत्राचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे, सदर प्रकार रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे बातमीदार साईनाथ म्हात्रे, हर्षल पाटील यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिल्या नंतर त्याबाबतची सर्व शहानिशा केली व तेथील फुटेज घेऊन, प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथे गेले असता त्यांनी आम्ही त्यास कोणताही ना हरकत दाखला दिला नाही तसेच पोल्ट्री फार्म ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे तेथील सरपंच प्रमोद ठाकूर यांची भेट घेतली असता ते म्हणाले की आम्हास कोणताही आदेश मिळाला नाही त्यामुळे तो व्यवसाय आम्ही बंद करू शकत नाही.
प्रीमियर कंपनीचे मॅनेजर यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.
या व्यवसायास प्रीमियर कंपनीद्वारे पाठबळ दिले जाते त्यामुळे प्रीमियर कंपनीच्या मॅनेजर सोबत आपले वार्ताहर साईनाथ महात्रे यांनी फोनद्वारे विचारपूस करताच ते म्हणाले आमच्याकडे लेखी तक्रार नाही तेथील नागरिक फक्त भेटून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण जरी झाला तरी आम्ही तो व्यवसाय सुरूच ठेऊ. आपल्या प्रतिनिधीने वारंवार त्यास विचारले की तुम्हास नागरिकांच्या आरोग्याचा विचार नाही का ? तर ते म्हणाले की आम्ही त्यास बांधील नाहीत कंपनीचा उद्देश नफा हा आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना शासकीय यंत्रणा मात्र या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
10 months ago

There’s certainly a lot to know about this topic.
I really like all of the points you have made.

7 months ago

Comment un couple devrait – Il gérer cela une fois qu’il découvre que son conjoint triche ? La question de savoir si un mari doit pardonner à sa femme sa trahison est un sujet qui mérite d’être discuté.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x