पुणे

“किनगाव राजा महसूल मंडळात ढगफुटीसारखा पाऊस, तरीही पर्जन्यमापक यंत्रात ‘पाऊस नाही’ची नोंद!”

प्रतिनिधी – बुलढाणा जिल्हा बालाजी सोसे

मागील वर्षी याच पद्धतीने या मंडळावर अन्याय झाला याही वर्षी याच पद्धतीने या मंडळाला अन्याय होत आहे किती दिवस शेतकऱ्यांनी सहन करायचं शेतकरी हा भोळा भाबडा असून त्याच्यावर अन्याय करू नका साहेब सांगा साहेब शेतकऱ्यांनी जगायचं कसं

किनगाव राजा महसूल मंडळामध्ये मागील चार दिवसांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टी पाऊस होऊन शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले पातळगंगा नदी पूर्ण पणे भरून गेली.वड्या नाल्याला जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले ,शेतकऱ्याच्या शेतामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले शेतकऱ्याचा तोंडचा घास निसर्गाने हिरावला हे सर्व असताना सुद्धा किनगाव राजा महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रणा बंद अवस्थेमध्ये आहे. या परिसरामध्ये दिनांक सहा 6/8/9 या तारखेमध्ये धो धो पाऊस पडला दिनांक 6 ऑगस्ट रोजी रेन फॉल रिपोर्टनुसार 1.5 आणि 9 ऑगस्ट रोजी सकाळी तीन वाजेपासून ते दिवसा दोन वाजेपर्यंत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते त्या वेळेचा रेन्फोट रिपोर्ट 18.3 मिली चा पाऊस दाखवत आमच्या महसूल मंडळामध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी कुठेच एक थेंब सुद्धा पाऊस पडला नाही तरीसुद्धा पाऊस दाखवत आहे.

आणि याच मंडळामध्ये 100 मिलि पेक्षा अधिक पाऊस पडल्याची सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अवस्था आहे मग असं असताना सुद्धा प्रशासन झोपा घेता का मागील वर्षी याच पद्धतीने शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने व शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन पर्जन्यमापक यंत्रणेजवळ करण्यात आले त्यावेळेसचे विद्यमान तालुका कृषी अधिकारी श्री पंचाळ साहेबांनी लेखी स्वरुपात माहिती दिली की ही यंत्रणा बंद अवस्थेमध्ये आहे किनगाव राजा महसूल मंडळाच्या जवळ असणाऱ्या महसूल मंडळाचा निकष धरून तुम्हाला त्या पद्धतीने न्याय देण्यात येईल मग सिंदखेड राजा सोनशि महसूल मंडळ मागील वर्षी अतिवृष्टी मध्ये बसलेली मग, किनगाव राजा महसूल मंडळ ही वगळण्यात आले. असं किती दिवस चालणार आणि या मंडळावर किती दिवस अन्याय होणार हाच प्रश्न आता शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने विचारण्यात येत आहे. आणि याच करिता दिनांक 12 ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयाला जबाब मागण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी जाणार आहे एक तर आम्हाला न्याय द्या नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी जसे इतर महसूल मंडळ अतिवृष्टी मध्ये बसले त्याच पद्धतीने किनगाव राजा महसूल मंडळ अतिवृष्टी मध्ये बसवा आणि संबंधित पर्जन्यमापक संबंधित विभागावर गुन्हा दाखल करून रेसर कारवाई करा अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे
मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं सांगा साहेब शेतकऱ्यांनी जगायचं कसं….!