पुणे

माळशिरस वेळापुर येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी दाम्पत्यास अटकपूर्व जामीन मंजुर

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

वेळापुर – खंडाळी येथील अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर अल्पवयीन तरुणी चार महिन्याची गरोदर राहिल्याने तपासणी करीता डॉक्टरांकडे घेऊन जाऊन तिला कोणालाही वाच्यता न करण्याबाबत सांगुन दिनांक 28 जून रोजी गर्भपाताचा चार गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी सोलापुर ग्रामीण हद्दीमधील वेळापुर पोलीस स्टेशन येथे आरोपी रेश्मा दीपक शिंदे व दीपक तानाजी शिंदे यांच्यावर तसेच इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरणी आरोपींनी ॲड. बि. आर. भिलारे, ॲड.विक्रम भिलारे, ॲड. ए. एम वाळेकर, ॲड. आर. एस जगदाळे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

सदरील जामीन अर्जावर सुनावणी करताना आरोपीचे वकील ॲड . बि. आर भिलारे व ॲड.विक्रम भिलारे यांनी ” आरोपींनी कोणताही गुन्हा केला नाही तसेच पीडित मुलीस केवळ त्रास होत असल्याने तिला तपासनी करिता दवाखान्यात घेऊन गेले होते, डॉक्टर यांनी मुलीची तपासणी करून औषध दिली. त्याबाबत कोणतीही माहिती आरोपी दाम्पत्यास नव्हती.”
सदरील प्रकरणात पोलीस व सरकारी वकील तसेच आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी यांना अटी व शर्ती वर जामीन मंजुर केला.