पुणे

स्वाभिमानी मराठा महासंघ इतिहास मंचाच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख” पदी लक्ष्मीकांत राजे शिर्के

अहिल्यानगर (प्रतिनिधि) : भारतासह जागतिक स्तरावर मराठा हिताच्या दृष्टिने शिव-शंभुकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ इतिहास मंचाच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख” पदी पेडगाव, किल्ले धर्मवीरगड येथील शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज व इतिहास अभ्यासक श्रीमंत लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के यांची नुकतीच निवड करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजेशिर्के यांना दिले आहे.

श्री. लक्ष्मीकांत राजे शिर्के हे गेल्या ३० वर्षापासून गडदुर्ग संवर्धन कार्यासह दुर्लक्षित वास्तव इतिहास प्रकाशात आणणे, चुकीच्या इतिहासाचे पुरावे देऊन आक्षेप खंडन करणे, मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचा प्रचार प्रसार करणे, विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे, युगपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, स्मृति दिन, स्मरण दिन आयोजित करणे तसेच शंभुसेना संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य राजेशिर्के यांनी केली आहेत. अशा आदी विविध कार्याची दाखल घेऊन संघटनेने त्यांची एकमताने सार्थ निवड केली आहे. तसेच वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी नुकतेच इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्व शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाईंची (राजमाता राजाऊ साहेबांची) जयंती व पुण्यतिथी तारखांचा शोध घेऊन २७ जुलै रोजी राज्यभरात प्रथम जयंती उत्सव सुरू करून ऐतिहासिक मोलाचे कार्य केल्याने राजेशिर्के यांची आ.स्वा.मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख ” पदी निवड केली असल्याचे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नियुक्ती नंतर बोलताना राजेशिर्के म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ हा ऐतिहासिक वारसा जोपासणारी संघटना असून, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) यांच्या तेजस्वी इतिहासाची तरुणांना जाणीव करुन देण्यासाठी संघटना कायम प्रयत्न करत असून, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही संघटना कायम आवाज उठवत आहे. याकार्याला आणखी बळ देता यावं म्हणून आ.स्वा.मराठा महासंघ व इतिहास आघाडीच्या माध्यमातून मराठा समाजाचे संघटन वाढविण्यासाठी, मराठ्यांच्या इतिहासाचा जगभर जागर करणे कामी, छत्रपती शिवरायांचे नितिशास्त्राचे युवकांना प्रबोधन करण्यासाठी, ऐतिहासिक वास्तुंची माहिती देणे, गडकिल्ले संवर्धन आदी सर्व बाबींवर तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले. लक्ष्मीकांत राजे शिर्के हे सध्या अनेक सामाजिक संस्थावर महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एम के बी एन आर सागर, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार, आंतरराष्ट्रीय इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्याख्याते रवींद्र जगदाळे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंह जाधवराव, आंतरराष्ट्रीय सचिव उज्वलसिंह गायकवाड, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजीत घोरपडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, महिला आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्षा किरण शेखावत, महिला आघाडी भारत राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्षा महिला आघाडी शिवशंभू प्रिया जांभळे, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैय्या कुर्मी, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले, महाराष्ट्र राज्य निरीक्षक व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आदिंनी स्वागत केले आहे.