पुणे

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तीन सराईत गुन्हेगारांना केले स्थानबंद – लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

अधिक माहिती अशी की, मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरिर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

त्यांच्या आदेशास अनुसरुन सन २०२२ चे गणेशोत्सव काळात लोणी काळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्या करीता अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करण्या साठी आदेश श्री राजेन्द्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना दिले. त्यानुसार गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १. अमित बालाजी सोनवणे वय २६ वर्षे रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे २. गणेश बाळू भोसले वय २६ वर्षे रा. माळी मळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे. ३. करण ऊर्फ सत्या बाळु पांढरे वय २२ वर्षे रा. खंडोबाचा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली जि. पुणे हे शरिराविरुध्दचे रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेशोत्सव काळात गुन्हा करण्याची व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गणेशोत्सवाचे आनंदात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रतिभा तांदळे, सहा. पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी मा. राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली
गुन्हेगारांचा फौ. प्र. सं. क. १५१(३) प्रमाणे प्रस्ताव तयार करून न्यायालयात सादर केला असता मा. न्यायालयाने गुन्हेगारांना गणेशोत्सव कालावधीकरीता येरवडा कारागृह या ठिकाणी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले असुन त्याप्रमाणे गन्हेगारांना येरवडा कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस निरीक्षक श्री राजेन्द्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली , सहा पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप धनवटे यांनी केली आहे.