पुणे

लोणी काळभोर हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या लोणी काळभोर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर हद्दीतील कुंजीर वाडी येथील धुमाळ मला येथे दि. १६/०५/२०१३ रोजी दुपारी ११:३० ते ०४:०० या दरम्यान फिर्यादी नामे.मंदार सुभाष धुमाळ( रा. धुमाळमला श्रीनाथ मस्कोबा मंदिराच्या मागे, थेऊरफाटा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे.) यांचे घर बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने भर दुपारच्या वेळेत घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूमधील लोखंडी कपाट तोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण २०५००/- किमतीचा मुद्देमाल चोरी केल्या बाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३२१ / २०२३ भा.द.वि ३८०, ४५४ प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे.

सदर दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथक प्रभारी पो.उप.नि अमित गोरे व त्यांचे सोबतचे तपास पथकातील अंमलदार यांना नमूद गुन्हा उघडकीस करण्यासाठी सूचना दिल्याने सदर गुन्हयाचा तपास करत असताना घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही फुटेज व ताजिक विश्लेशन करून आरोपीतांचा शोध घेण्याचे काम सुरू असताना पो.ना सुनिल नागलोत व पो.शि. दिपक सोनवणे याना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे सोलापूर रोडवर कवडीपाट टोलनाका येथे दिवसा घरफोडी करणारे दोन इसम तोंडाला रूमाल बांधून पल्सर दुचाकीवरून फिरत आहेत. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाचे पाठीवर काळया रंगाची बॅग आहे.माहिती मिळाल्याने सदर इसमास तपास पथकातील पो.उप.नि अमित गोरे व त्यांच्या टीमने सापळा रचून शिताफीने व कौशल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी १) जलसिंग रजपुतसिंग दुधानी, (वय ३० वर्षे, रा. सर्वे नं ११०, अंध शाळेच्या पाठीमागे, रामटेकडी हडपसर पुणे, २) हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, (वय ३२ वर्षे, रा. रामटेकडी बस स्टॉपशेजारी, कोठारी मारूती कार शोरूम जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते पोलीस अभिलेखावरील घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता दोन्ही आरोपीच्या कमरेला लावलेले दोन लोखंडी चाकु मिकूल आले. तसेच त्यातील एका आरोपीचे पाठीवरील काळया बॅगमध्ये २ लोखंडी कटावणी, एक लोखंडी चिमटा, तसेच त्यांच्या ताब्यातील काळे रंगाची पल्सर दुचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता सदची गाडी शिवाजीनगर परिसरामधून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. नमूद आरोपीचांकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने कसून तपास केला असता त्यांनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून वेगवेगळ्या गुन्हयामध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. दोन्ही आरोपींकडून एकूण ३,८२,५००/- रु किंमतीचा गुन्हयांतील मुद्देमाल त्याचेकडून जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

१) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२१/२०२३ भा.द.वि. ३८०, ४५४.२) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं १०१ / २०२३ भा.द.वि. ३८०.४५४. ३) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ३११ / २०२३ भा.द.वि ३८०, ४५४, ४५७. ४) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ४९३ / २०२३ भा.द.वि ३८०.४५४
(५) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं ५०२/२०२३ भा.द.वि ३७९.

 

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर श्री रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री संदिप कर्णिक, मा.अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त सो हडपसर विभाग, पुणे शहर सौ. अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. सुभाष काळे व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक श्री अमित गोरे, पो.हवा. सतिष सायकर, पो.हवा सुदर्शन बोरावके, पो.ना. सुनिल नागलोत, पो.ना. श्रीनाथ जाधव, पो.शि. दिपक सोनवणे, पो.शि. शैलेश कुदळे, पो.शि. बाजीराव विर, पो.शि. चक्रबर शिरगिरे, गपोशि, विश्रांती फणसे याचे पथकाने केली आहे.