पुणे

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी हालचाल IPS Tejaswi satpute करणार तपास

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत असून, तपासासाठी विशेष एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

या एसआयटीच्या प्रमुखपदी अहिल्यानगरच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत संवेदनशील आणि कठोर तपासासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस्वी सातपुते यांच्यावर आता या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी आहे.

 

गेल्या १२ वर्षांत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास केला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. लहानपणी बेशिस्त आणि आळशी असलेल्या तेजस्वी यांना त्यांच्या आईच्या एका कठोर निर्णयाने आयुष्यात वळण मिळालं आणि त्यांनी शिक्षणात मोठं यश मिळवलं.

दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये १९८ वा क्रमांक मिळवत त्यांनी IPS पद गाठलं. तपासातील बारकावे ओळखण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना “महाराष्ट्राच्या शेरलॉक होम्स” अशी ओळख मिळाली आहे.

आता सर्वांचं लक्ष लागलंय—तेजस्वी सातपुते खरात प्रकरणाचा नेमका उलगडा कसा करतात, याकडे.