लोहगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून पावसाळ्यात येथे हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. लोणावळा आणि पवना परिसरात आलेले पर्यटक तसेच ट्रेकिंग ग्रुप आवर्जून लोहगडला भेट देतात.
मात्र, १८ जून रोजी घडलेल्या केतन अगरवाल हत्याकांडानंतर या किल्ल्याची चर्चा आणखी वाढली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला याच किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर नेमका तो स्पॉट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि उत्सुक नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
