पुणे

मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? कोण IN? कोण OUT?

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार का? संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांमध्ये बदल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनही एक नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
व्हॉईस ओव्हर :
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे खाते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर त्यांच्यावर टीका झाल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्याचवेळी, विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तर माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची चर्चा आहे.
संभाव्य नव्या चेहऱ्यांमध्ये नितीश कुमार, शक्तिकांत दास, सुखेंदू शेखर राय, तरुण चुघ, राघव चड्ढा, श्रीकांत शिंदे आणि अनुराग ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत.
दुसरीकडे मनोहर लाल खट्टर, रवनीत सिंग बिट्टू, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याने राज्यातील राजकारणालाही वेग आला आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा फेरबदल होऊ शकतो. मात्र, या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता सर्वांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.