पुणे

*”पुरंदर तालुक्यात खळबळ……..२२ वर्षीय तरुणीची हत्या; आरोपी अटकेत !”*

पुरंदर तालुक्यातील खानवडी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीलम महेंद्र गायकवाड असं मृत तरुणीचं नाव असून ती माळशिरस, ता. पुरंदर येथील रहिवासी होती. १ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, अनिकेत विष्णू जाधव या २१ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून नीलम हिच्यावर हल्ला केला. मारहाण करून तिचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणी मयत तरुणीचे वडील महेंद्र गायकवाड यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपी अनिकेत जाधव याला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.या घटनेमुळे खानवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.