पुणे

कौटुंबिक वादाचे भीषण रूप; तरुणाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या वाटणीच्या वादातून आणि कौटुंबिक रागाच्या भरात ३२ वर्षीय तरुणाचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला आहे.
ही घटना कृष्णा गार्डन सोसायटी, जीवन चौक, काळेवाडी येथे १ जुलै रोजी घडली. मृताची ओळख गणेश राजेंद्र पाखरे अशी झाली आहे.
या प्रकरणी रोशन ऊर्फ मयूर पाखरे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृताचा ६२ वर्षीय चुलता संजय उमाजी पाखरे याला अटक केली आहे.
प्राथमिक तपासात घराच्या वाटणीवरून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच नोकरी आणि कौटुंबिक कारणांमुळे आरोपीच्या मनात गणेशबद्दल राग होता.
याच रागाच्या भरात लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमाळे करत आहेत.