हडपसरकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?
पुण्यातील हडपसर परिसरात धोकादायक आणि बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. पुणे-सोलापूर रोड, शेवाळवाडी ते मगरपट्टा, मुंढवा रोड आणि डीपी रोड, ताडी गुत्ता चौक, आकाशवाणी, हडपसर, मगरपट्टा गाव मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत.
वादळ किंवा पावसाच्या वेळी ही होर्डिंग कधीही कोसळू शकतात… आणि मोठी दुर्घटना घडू शकते.
स्थानिकांचा आरोप आहे की, होर्डिंग माफिया अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत. काही ठिकाणी तर बिल्डिंगचे कंप्लेशन सर्टिफिकेट असतानाही होर्डिंग उभारले गेले आहेत… इतकंच नाही तर यासाठी वृक्षतोडही करण्यात आली आहे.
नागरिकांची स्पष्ट मागणी –
सर्व बेकायदा होर्डिंग तात्काळ हटवावीत
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
आणि होर्डिंग माफियांवर गुन्हे दाखल करावेत
आता प्रश्न एकच — महापालिका जागी होणार का?
की एखादी दुर्घटना झाल्यावरच कारवाई होणार?
